रत्नागिरी : तालुक्यातील शिरगांव, कासारवेली, काळबादेवी, कोतवडे बसणी या भागातील रस्त्यांवरील खड्डे गणपती येण्यापूर्वी भरावेत असे आदेश असताना सुद्धा अजूनही खड्डे भरले गेले नाहीत. या रस्त्यावरून जाणाऱ्या व पर्यटक लोकांचे अतोनात हाल होत आहे. यातून खूप लोकांना शारिरीक आजार निर्माण झालेले आहेत. उदा. कंबरदुखी, पाठदुखी, कमरेचे आजार झालेले आहेत. व गाड्यांचे नुकसानही होत आहे.
पावसातून रात्रीचा प्रवास करताना खड्डा आहे की पाणी हे कळत नाही. यातून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व गोष्टींना जबाबदार कोण? तसेच तुमचे खड्डे भरणारे कामगार दहा खड्ड्यामधील चार खड्डे भरून काम थांबवतात. आणि दगड नीट न भरल्यामुळे त्याची टोके तशीच राहतात. याला कारण म्हणजे त्यांच्यावर सुपरवायझर नाही. असे असूनही बांधकाम करते मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांच्यात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे रस्त्यावरील हे खड्डे तातडीने भरण्याची कारवाई करावी अशी विनंती या ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात अजय बाळकृष्ण प्रसादे, रविंद्र यशवंत पांचाळ, सतिश ए. कामेरकर, सचिन पु. भिंगार्डे, मोहम्मद राजवाडकर, सचिन पाटील, गौरी नितीन घोसाळकर, धनंजय नाईक, प्रतिक मयेकर, आकाश मयेकर, अक्षय मयेकर, धनंजय वामन दाते, शरीफ मंगा, मिलिंद प्रसादे, स्नेह अजय प्रसादे, डॉ. यश मिलिंद पदे, सचिन पुरूषोत्तम भिंगार्डे, अहमद पटेल, इरशाद अहम शहा , सिराज मेमन आदींच्या सह्या आहेत.