भारत जोडो यात्रेला समर्थन देण्यासाठी  

बापू कुटी समोर घेतली शपथ

यात्री निवास येथे दक्षिणायन ची सभा

वर्धा : भारत जोडो यात्रेला समर्थन देण्यासाठी सेवाग्राम येथील यात्री निवास मध्ये आज 14 ऑक्टोंबर रोजी एक देशातील विचारवंत ,साहित्यिक ,विद्वान , यांच्या उपस्थितीत सभा पार पडली.

या सभेला दिल्लीचे राजेश मलेठीया, डॉ. राम पूनियानी, कुमार केतकर, योगेंद्र यादव, प्रतिभा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सभेत देशात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेला कोणत्या स्वरूपात, कशी आणि काय मदत करता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली . सभेत झालेल्या निर्णयाचे पूर्णपणे पान करण्याची शपथ बापू कुटी समोर घेण्यात आली.

या सभेत देशातील विविध भागातून 150 विद्वान, विचारवंत, विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

काल नागपूर येथे 13 ऑक्टोंबर रोजी एक सभा पार पडली. आज सेवाग्राम येथे दक्षिणायनच्या वतीने दुसरी सभा घेण्यात आली. अशी माहिती दक्षिणायन चे गणेश देवी यानी दिली.