औरंगाबाद कृषीमंत्री अब्दुल सत्तार कुणालाही काही म्हणतात , जिल्हाधिकारी शांत का बसले असा सवाल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे . तर सत्तारांनी मुस्लिमांच्या जमीनी हडपल्या असा आरोपही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे . शेतकऱ्यांना अब्दुल सत्तारांनी हिनवले आहे , सत्तारांना गाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असे सांगतानाच शिक्षकांच्या घोटाळ्यात त्यांचे नाव समोर आल्याचा उल्लेखही चंद्रकांत खैरेंनी केला आहे . चंद्रकांत खैरे म्हणाले ? शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की , देवेंद्र फडणवीस यांना हा बेशीस्तपणा आवडतो का , अशा लोकांमुळे तुमचे मंत्रिमंडळ बदनाम होत आहे , सत्तार यांच्या सारख्या लोकांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायला हवे असा सल्लाच त्यांनी फडणवीसांना दिला आहे .हिरवा साप सरडा झाला देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे की सत्तार भाजपमध्ये आले होते , पण स्थानिक भाजपने त्यांना नाकारले . त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली . त्यामुळे त्यांना शिवसेनेत घ्यावे लागले आणि निवडूण आणावं लागले , मात्र तेव्हाही सत्तार हिरवा साप होते नंतर भगवा झाला होता आता ते सरडा झाले आहे , अशी विखारी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे . अनेक मुस्लिम बांधवांसमोर मी हे बोलतो तेही मला म्हणतात असे सांगतानाच सत्तारांनी मुस्लिमांच्या जमीनी हडपल्या असा आरोपही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे . शिंदेंच्या हाती काहीच नाही एकनाथ शिंदे यांच्या हातात काही नाही , प्रोजेक्ट बाहेर जात असताना मुख्यमंत्री केवळ लोकांच्या घरी भेटी देण्यात व्यस्त आहे . म्हणून मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनंती करेल की त्यांनी या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे अशा माणसाला काढूण टाकवे असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे .