कन्नड : कोणी गुवाहाटीला जाऊन आले , कोणी शिवतीर्थावर मेळावा घेतला , तर कोणी केबीसीवर मात्र माझ्या शेतकऱ्यांच्या हातात काय पडले याचा विचार करणे गरजेचे आहे . तुमचे वीज कनेक्शन कट केले काय ? तुमचे नुकसान झाले काय ? या प्रश्नावर तुमची बाजू घेऊन भांडायला , बोलायला कोणालाच वेळ नाही . त्या सर्वांचे खोके घेऊन ओके चाललंय . परंतु तुम्हा शेतकऱ्यांना धोकेच मिळताहेत . त्यामुळे आपल्याला आता कायद्याचे हत्यार हाती घेऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गुरुवारी केले . विद्युत महामंडळाने तयार केलेल्या कायद्याचे वाचन करून जिल्हाभरातील शेतकऱ्यांना हा कायदा अवगत व्हावा , यासाठी जनजागृती मेळाव्याचे आयोजन गुरुवारी , शुक्रवारी औराळा , जेहूर येथे करण्यात आले होते . उध्दव बोरसे , शरद निकम , योगेश कदम , नितीन जिवरख , अंकुश निकम , रमेश निकम , संदीप काळे , बाबासाहेब आहिरे , मुन्ना वारे , विनायक वाघचौरे , संजय मिसाळ , सचिन पगारे आह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते