कन्नड : मागील वर्षी बारामती अॅग्रोने १० लाख १७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते . यंदा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्यात येणार आहे . बारामती ॲग्रो युनिट -२ कडून ११ ते १२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार असल्याची ग्वाही बारामती ॲग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी दिली . कन्नड येथील बारामती ॲग्रो युनिट -२ चे १० वे बॉयलर अग्निप्रदीपन चेअरमन राजेंद्र पवार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले . त्या वेळी पवार बोलत होते . या वेळी कर्मचारी गणपत खुळे या दांपत्याच्या हस्ते पूजा करण्यात आली . मुख्य व्यवस्थापक मिलिंद देशमुख , शेतकी अधिकारी आसिफ खान पठाण , उपविस्तार अधिकारी प्रवीण भापकर आदींची उपस्थिती होती . बारामती ॲग्रो युनिट -२ कडून चेअरमन पवार , व्हाइस चेअरमन सुभाष गुळवे , मुख्य कार्यकारी अधिकारी आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात मागील वर्षी लोकसहभागातून नदी , नाले खोलीकरण केले होते . यामुळे सिंचनाची मोठी सोय झाली आहे . यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून कमी पाण्यात व कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या उसाची लागवड केली आहे . यासाठी बारामती ॲग्रोचे मानव संसाधन अधिकारी संजय सस्ते , सुनील देवकाते , सतीश तेलहांडे आदींनी परिश्रम घेतले