सोलापूर - दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाअंतर्गत नागरी पथविक्रेत्यांना सहाय्य या करीता सोलापूर शहरातील सर्व पथविक्रेताना सर्वेक्षणामध्ये सहभागी होऊन आपली नोंदणी करण्याचे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले होते. त्या अंतर्गत 6113 पथ विक्रेत्याची नोंदणी सर्वेक्षण द्वारे करण्यात आलेली आहे. तरी सदरील यादी सर्वाना पाहण्या करिता सोलापूर महानगर पालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
तरी सदरील यादी बाबत आपल्या काही सूचना किंवा हरकती असतील तर त्या दाखल करण्या करिता सोलापूर महानगर पालिका प्रशासकीय इमारत तिसरा मजला, शहर अभियान व्यवस्थापन कक्षात दाखल करू शकता व अधिकची माहिती घेऊ शकता. तरी सर्व पथ विक्रेत्यांना याद्वारे कळविण्यात येत आहे कि मुदतीनंतर आलेल्या कोणत्या हरकती व सूचनाचा विचार करण्यात येणार नाही.अशी माहिती उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दिली.