परभणी,दि.13 (जिमाका): जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी आयोजित केला जातो. जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी तर तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार हे अध्यक्ष असतात. समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा, तसेच समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. ऑक्टोबर, 2022 या महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 17 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजीत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील महिलांनी त्यांच्या वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी विहीत नमुन्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, परभणी यांचे कार्यालयात दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
▶️মাৰ্ঘেৰিটাত ৰাইজে জব্দ কৰিলে অবৈধ বালি ভৰ্তি ডাম্পাৰ
▶️মাৰ্ঘেৰিটাত ৰাইজে জব্দ কৰিলে অবৈধ বালি ভৰ্তি ডাম্পাৰ
🔴LIVE Navratri | Turkh Rode Navratri Botad | Jay Ambe Yuvak Mitr Madal |
🔴LIVE Navratri | Turkh Rode Navratri Botad | Jay Ambe Yuvak Mitr Madal |
ગુજરાતમાં આજથી આગામી બે દિવસ સુધી વરસાદ પાડવાની આગાહી કરવામાં આવી
ગુજરાતમાં આજથી આગામી બે દિવસ સુધી વરસાદ પાડવાની આગાહી કરવામાં આવી