जिंतूर तालुक्यातील

सावंगी (म्हाळसा) निवासी शेतकरी रमेश दादाराव चव्हाण हे 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आपल्या शेत-आखाड्यवर आपले जनावरं बांधून घरा कडे गेले होते. व सायंकाळी सात वाजता जेंव्हा ते आपल्या शेत-आखाड्यवर भर पावसात येऊन आपल्या म्हशी चे दुध काढण्यासाठी आले तेंव्हा त्यांना आपली म्हैस शेतात म्रत अवस्थेत दिसून आली. या म्हशीच्या म्रत्यु चे कारण समजू शकले नाही. आज 13 ऑक्टोबर रोजी पशुवैद्यकीय दवाखान्यातील संबध्दीत डाॅक्टर यांनी घटना स्थळी येऊन म्रतक अवस्थेत पडलेल्या म्हशीचा पंचनामा केला आहे. या म्हशीची किंमत 80 हजार रुपए दाखवली जात आहे. प्रशासन ने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी रमेश दादाराव चव्हाण यांनी केली आहे.