शिरुर: शिरुर तालुक्यातील बेट भागात असणाऱ्या जांबुत गावात महीन्याभरात बिबटयाने दोन जणांचे बळी घेतले आहे. तसेच दोघेजण गंभीर जखमी आहेत. त्यामुळे वनविभाग अजून किती जणांचे बळी गेल्यावर जागे होणार..? असा प्रश्न येथिल नागरीकांना पडला असून कवठे येमाई,सविंदणे, फाकटे, चांडोह, जांबुत, माळवाडी, सरदवाडी, पिंपरखेड, टाकळी हाजी येथील ग्रामस्थ बिबटयाच्या बंदोबस्त करण्यासाठी वन विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचे डॉ .. संतोष ऊचाळे यांनी सांगितले आहे.
या परिसरात बिबट्याने धुमाकुळ घातला असून पशुधनाबरोबर नागरीकांनाही तो भक्ष करू लागल्याने ग्रामस्थांमध्ये प्रंचड भितीचे वातावरण पसरले आहे. उचित कार्यवाहीसाठी जांबुत ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून कडकडीत बंद पाळला आहे.तसेच महावितरण विभागाने शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यासाठीही तीव्र लढा या भागातील नागरीक करणार असून सोशल मीडियावर तशा चर्चा रंगू लागल्या आहे. सदर घटनेच्या ठिकाणी सोलापूर येथे मोठे अथक परीश्रम घेत नरभक्षक बिबटया ठार केलेले शार्प शुटर डॉ. चंद्रकांत मंडलिक हे घटनास्थळी भेट देणार आहेत.