महाराष्ट्रातील शाळा बंद करून भावी पिढ्या बरबाद करायच्या का ? - डॉ महेश नाथ

आष्टी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिले निवेदन 

आष्टी। प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्यातील वाडी वस्ती ताड्यातील शाळा २० कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा शासनाच्या हुकमी निर्णय वापस घ्यावेत, तसेच भावी पिढ्या शासनाला बरबाद करायच्या आहेत का?असा सवाल उपस्थित करत बुधवार दि १२ ऑक्टोबर रोजी आष्टी तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

 राज्यांमधील 0 ते 20 पटसंखेतील शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे या निर्णयाच्या निषेधार्थ सरकारच्या विरोधात बुधवारी आम आदमी पार्टी आष्टी तालुक्याच्या वतीने तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. हा निर्णय सरकारने मागे घ्यावा अशा स्वरूपाचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आले.निवेदन देताना यावेळी तालुकाध्यक्ष अध्यक्ष डॉ महेश नाथ ,प्रा.राम बोडखे, तालुका संघटक मुकुंद कोल्हे ,सलीम सय्यद ,बी जी जावळे ,मनोज विधाते व आदी उपस्थित होते .