रत्नागिरी : तन्वी घाणेकर या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात पोलिस वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत आहेत. लहान मुलांना टाकून आई आत्महत्या कशी करू शकते? तिला मुलांची चिंता नाही का? तिची डीएनए चाचणी ही करण्याचे पोलिसांनी ठरवले. मात्र कॉल डिटेल्स तपासल्यानंतर काही संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे ही आत्महत्या आहे की खून याचा उलगडा पोलिस लवकरच करणार आहेत.
तन्वी रितेश घाणेकर (33, खालचा फगरवठार) ही विवाहिता बेपत्ता झाली होती. 29 सप्टेंबर रोजी तन्वी 7.15 वाजण्याच्या सुमारास 'मी बाजारात जातेय, उशीर झाला तर तुम्ही जेवून घ्या' असे मुलीला सांगून दुचाकी घेऊन गेली होती. त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी पोलिस स्थानकात ती बेपत्ता झाल्याची तक्रार पतीने दिली होती. त्यानंतर 2 दिवसांनी भगवती किल्ला येथील कपल पॉइंट खाली 200 फूट खोल दरीत तन्वी घाणेकर हीचा मृतदेह सापडला. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली. मात्र पोलिसांसमोर अनेक प्रश्न होते. तन्वी ही घरी चांगल्या पद्धतीने सांगून गेली होती. शिवाय लहान मुलीला सोडून आई आत्महत्या करू शकते का? यात काही काळ बेर आहे का? असे अनेक प्रश्न होते. शेवटी पोलिसांनी डीएनए चाचणी करण्याचेही ठरवले. मात्र आता डीएनए चाचणीची गरज नाही असे पोलिसाना वाटते. कॉल डिटेल्स वरूनच काही स्पष्ट झाल्या आहेत. तन्वी हीचा मोबाईल अद्याप सापडलेला नाही. तिचे ६ महिन्यांचे कॉल डिटेल्स पोलिसांनी घेतले आहेत. यात काही संशयास्पद माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता निर्णायक वळणावर आले आहे. आता पोलिस संशयितांपर्यंत पोहचण्यासाठी काही पावले दूर आहेत. लवकरच तन्वी हीची आत्महत्या की खून हे उघड होणार आहे.