कन्नड : कन्नड शहरात एक वेगळ्या प्रकारचा वाढदिवस साजरा झाल्यानें चर्चेचा विषय ठरला आहे. तालुक्यातील स्वराज्य रक्षक संघ कन्नडचे स्वयंसेवक अमोल तगवाले यांनी आपली मुलगी कु. माही हिचा वाढदिवस आदिवासींच्या बालकांसोबत साजरा केला तसेच तिथल्या गरजू लोकांना थंडीच्या निमित्ताने ब्लैंकेट व शाल वितरीत केले.

आदिवासींच्या जमलेल्या मुलांसोबत कु. माहीच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आले. आपल्या मुलांसोबत माहीचा वाढदिवस साजरा झाल्यानें तिथल्या लोकांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकत होती.

‘माझ्या मुलीचा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी आनंदाचा दिवस आणि यादिवशी मी आणि माझ्या घरचे लोकं आनंदी तर होणारच. पण या आनंदोत्सवात गरीब गरजू आदिवासींच्या मुलांना सहभागी केल्याने आम्हाला जे आनंद प्राप्त झाले ते कुठे ही मिळणे शक्य नाही’ असे प्रतिपादन बर्थडे बेबीच्या पित्याने केले. आपल्या मुलीचे वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याने अमोल तगवाले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वराज्य रक्षक संघ कन्नड संस्थापक अध्यक्ष नितीन राठोड, सदस्य अमोल तागवाले,कृष्णा बडग, आदित्य पाटील,कैलास जाधव,उमेश राठोड,उमेश सातदिवे,जयेश देशमुख,साबळे भाऊ,बंटी इंगळे,अरूण मांसरे,हेमंत गर्गे,दिपक भाऊ डोळस यांनी मेहनत घेतली.

 

 ्