पैठण : तालुक्यातील होनोबाचीवाडी येथील गट नंबर 64 मधील शेतकरी चित्तरसिंग बहुरे यांच्या गाईच्या वासराला काल रात्री वन्यप्राण्याने गंभीर जखमी केले असुन वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी झालेल्या वासराला बघितले व परिसरात पाहणी केली असता परिसरात वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे बघितले त्यावरून बिबट्याचेच (चित्ता)ठसे आहेत.या परिसरात बिबट्याचा वावर असुन या करिता लोकांनी सावध रहावे, रात्रीघराबाहेर पडु नये,किंवा सावधगिरी बाळगावी असे वनविभागाचे वनरक्षक उमेश मार्कंडे यांनी सांगितले.होनोबाचीवाडी येथील परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.होनोबाचीवाडी येथील गट नंबर 64 मध्ये एका गाईच्या वासराला वन्यप्राण्याने गंभीर जखमी केले आहे.आज दि.12ऑक्टोबर रोजी सामाजिक कार्यकर्ता गजानंद बोहरा यांनी संबंधित वनविभागाचे अधिकारी यांना घटनेबाबत माहिती दिली असता वनविभागाचे अधिकारी उप वनसंरक्षक सुर्यकांत मंकावार वनपरिक्षेत्र अधिकारी दादा तौर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक उमेश मार्कंडे आणि वनमजुर रामधन राठोड मुख्तार शेख यांनीहोनोबाचीवाडी येथील गट नंबर मध्ये घटनास्थळी भेट दिली.परिसरात पाहणी केली असता बिबट्याचेच ठसे असल्याचे सांगितले.परिसरातील लोकांनी सावध रहावे रात्री घराबाहेर पडु नये,किंवा सावधगिरी बाळगावी,लहान मुलांना एकटे सोडू नये,मोठ मोठ्याने आवाज करत रहायचे,रेडिओ, स्पीकर वगैरे वर गाणे वाजवावे,वेळोवेळी फटाके वाजवावे,बिबट्या वाघ दिवसभर एकांतात बसुन राहतात आणि रात्री शिकार करतात.याकरिता सर्वच सावध रहाआणि काही वाटल्यास सामाजिक कार्यकर्ता गजानंद बोहरा यांच्यासह गावातील नागरिकांनी वनविभागाला कळवावे असे सांगितले.नागरिकांनी व तसेच शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी सावधान पूर्वक रहावे असे यावेळी सामाजिक कार्यकर्ता गजानंद बोहरा यांनी सांगितले.