रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील शुभम दिगंबर पाटील या कबड्डीपटूची २५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मध्यप्रदेशातील जबलपूर येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठातून निवड झाली असून शुभम पाटील मुंबई विद्यापीठाच्या शनिवार दि.१९ नोव्हेंबरपासून आयोजित सराव सत्रासाठी मुंबईकडे शुक्रवारी रात्री रवाना झाला आहे. 

       शुभम दिगंबर पाटील हा चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर शिक्षण संस्थेच्या मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. उत्कृष्ट चढाई व पकडीच्या जोरावर त्यांनी आपले नाव कबड्डी क्षेत्रात चमकवले आहे. चाफे मयेकर महाविद्यालयात तृतीय वर्ष बी.ए वर्गात तो शिकत आहे. 

     शुभम या खेळाडूला प्रशिक्षक ऋषिकेश उर्फ आप्पा मयेकर, बाबा मयेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शुभम याची मध्यप्रदेशातील जबलपूर येथील राणी दुर्गावती विश्वविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठातून निवड झाल्याबद्दल मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर, शिक्षण संस्थेचे सचिव व युवा नेते रोहित मयेकर, प्राचार्या सौ.स्नेहा पालये यांनी अभिनंदन करून शुभमला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.