दापोली : दापोली नगर पंचायतीत 5 कोटी 81 लाख 10 हजार 309 रुपयांचा अपहार केल्यापकरणी संशयित आरोपी लेखापाल दीपक दिलीप सावंत (44, रा. काळकाई कोंड दापोली) याच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तकार सिध्देश विश्वनाथ खामकर (32, कोकंबा आळी, दापोली) यांनी पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 एपिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत दीपक सावंत याने लेखापाल पदावर कार्यरत असताना विविध बँक खात्यांची दोन कॅश बुक तयार केली होती. त्यामध्ये दापोली नगर पंचायतीच्या विविध खात्यामध्ये शासनाकडून आलेल्या विविध निधीतून व न. पं. च्या स्वनिधी खात्यातून श्री एन्टरप्रायझेस, मंगेश पवार, शंकर माने, वरदा पोजेक्ट, राहुल राठोड, हुदा एन्टरपायझेस, नंदा एन्टरपायझेस, शामल जाधव, सुरज कुमार या विविध खात्यांवर 5 कोटी 81 लाख 10 हजार 309 रुपयांची रक्कम स्वतच्या फायद्यासाठी वापरून निधीचा अपहार केला. आणि शासनाची फसवणूक केली.
संशयित आरोपी दीपक सावंत हा दापोली नगर पंचायतीत 1 जानेवारी 2003 ते 31 मार्च 2022 या पर्यंत कार्यरत होता. मात्र कार्यालयीन चौकशी समितीने आर्थिक वर्ष 2021-22 या एक वर्षाच्या कालावधीतील अपहार केलेल्या रक्कमांचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये 5 कोटी 81 लाख 10 हजार 309 रुपयांची रक्कम हडप केल्याचे समोर आले आहे. असे असले तरी त्याने यापूर्वी किती म्हणजे 18 वर्षांत किती कोटींचा अपहार केला असेल अशी शक्यता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. एक लेखापाल एवढी मोठी माया जमा करु शकतो या प्रकाराने जिह्यात खळबळ उडाली आहे.
संशयित आरोपी दीपक सावंत याच्यावर पोलिसांनी भादविकलम 409, 420,201 पमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद अधिक तपास करत आहेत.