Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

गायरान जमिनीत अवैधरित्या गौण खणीजाचे उत्खनन करणाऱया एस कन्स्ट्रक्शनच्या आठ हायवावर वैजापूर महसुल प्रशासनाने कारवाई केली आहे. तालुक्यातील बाभुळगाव पिराचे परिसरात शासकीय गायरान जमिन आणि तलावातून गौणखणीज उत्खनन सुरु असल्याची माहीती तहसीलदार राहुल गायकावाड यांना मिळाली त्यानुसार त्यांनी बाभुळगावचे तलाठी जी आर जाधव यांना आदेशीत करून कारवाईच्या सुचना दील्या. त्यानुसार तहसीलदार गायकवाड यांनी त्यांचे महसूल कर्मचारी जालिंदर वाघ आणि सुरक्षा रक्षक आरिफ पठाण यांना तलाठी जाधव यांच्या सोबत करावाईसाठी पाठवले. यावेळी . तलाठी जी आर जाधव यांनी उत्खननाची परवानगी आहे का या विषयी विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलीही परवाणगी नसल्याचे दिसले. त्यानुसार पचनामा करून संपुर्ण आठही हायवा ताब्यात घेण्यात येवून शिऊर पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या आहेत. आता जमा केलेल्या हायवावर कधी व काय दंडात्मक कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.