२० पटसंख्याचा घोळ,शिंदेवस्ती करांच्या व्यथा
कमी पटसंख्येच्या शाळा बंद पडल्यास...जळजळीत वास्तव..शिंदेवस्ति (गारमाळ) विद्यार्थ्यांची व्यथा:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
पाटोदा तालुक्यातील मौजे. सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत शिंदेवस्ति (गारमाळ)अंदाजे ६०० लोकसंख्या असलेली वस्ति,विंचरणा नदीच्या पात्र अडवुन रामेश्वर साठवण तलावामुळे सौताडा गावापासून विभक्त,बीड-नगर राष्ट्रीय महामार्गापासून केवळ ३ किलोमीटर अंतरावर. २० वर्षापासून दळणवळणाचा प्रश्न बिकट अगोदरची ५ वर्षे ट्रकच्या ट्युबवर नंतर थर्माकोलवर आणि गेल्या २ वर्षापासून मुंबई येथील ब्रांदेकर गणेशोत्सव मंडळाने दिलेल्या तराफ्यावरून प्रवास करतात.
२ वर्षापासून जिल्हाप्रशासनाशी संगर्ष संघर्ष सुरू
१० ऑक्टोबर २०२० पासुन शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांच्या दळणवळणाची सोय व्हावी म्हणून शासन दरबारी निवेदने,आंदोलने भरपुर झाली पाटोदा उपविभागीय आधिकारी कार्यालय,तहसिल कार्यालय पासुन जिल्हाधिकारी कार्यालय ते विभागीय आयुक्त औरंगाबाद पर्यंत हा विषय मांडला परंतु केवळ आश्वासनेच मिळाली.
प्रसारमाध्यमामुळेच शिंदेवस्ति (गारमाळ) ग्रामस्थांना तराफ्याचा आधार
विविध आंदोलनातुन शिंदेवस्तिवरील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विषय विविध प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मिडीयाने उचलल्यानंतर मुंबई येथील बांद्रेकरवाडी मित्रमंडळाकडुन ३ तराफा,११ लाईफजॅकेट,८ सेफ्टी रिंग आदि अडीच लाख रूपये खर्च करून शुभम एरंडोल सचिव बांद्रेकरवाडी मंडळ यांनी दिले.
ऊसतोडीला गेल्यावर लेकरांना शाळेत कसे जाणार-बाळासाहेब शिंदे ?
पटसंख्या कमीमुळे शाळा बंद केल्यास वस्तिवरील मुलामुलींचे शिक्षणच बंद होईल,शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकली जातील ,आम्ही.उसतोड मजुर साखर कारखान्यावर गेल्यावर मुलांनी या जीवघेण्या पाण्यातुन कसं काय जाणार?
शासनाला शाळा बंद करू देणार नाही??? पाण्यात उतरून आंदोलन करणार:-स्वाती भोरे
शासनाने कमी पटसंख्या बंद करण्याचा निर्णय रद्दबातल न केल्यास पाण्यात उतरून डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जलसमाधी आंदोलन करणार ?