अवैध दारू विक्री करणाऱ्या पकडला 

"पोलीस उपविभागीय अधिकारी पैठण पथकाची कारवाई; २९ हजाराचा मुद्देमाल जप्त"

पाचोड(विजय चिडे) अवैधरित्या दावरवाडी फाटा वर देशी विदेशी मद्य विक्री करणाऱ्या परमेश्वर प्रभाकर मोरे यास रविवार,(दि.९) रोजी पहाटे साडे सातच्या सुमारास अवैधरित्या दारू विकताना पालीस उपविभागीय अधिकारी पैठण यांच्या पथकाने रंगेहात पकडले असून त्याच्या ताब्यातून 29 हजाराची देशी विदेशी दारूचे पाच बॉक्स ताब्यात घेतले आहे. पथकाचा धडाकेबाज कारवाई ने अवैधरित्या दारू विक्रेत्यांचे उपविभागीय अधिकारी पथकाच्या कारवाईने धाबे दणाणले आहे.

पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल नेहूल यांना गुप्त बातमीदारामार्फत अवैधरित्या देशी विदेशी दारू ची विक्री होत असल्याची मिळाली असता दावरवाडी फाटा येथे पथक धडकले असता अवैधरित्या परमेश्वर मोरे हा दारू विक्री करत असल्याचे आढळून आले सदरील दारू विक्री करणाऱ्या परमेश्वर मोरे रा.नांदर ता. यास पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या कडून २९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई ही पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया,सहायक पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.विशाल नेहूल यांच्या पथकातील पीलिस नाईक सचिन भूमे,सोनवणे,पोना अरुण जाधव,गणपत भवर यांनी पार पाडली आहे.

फोटो:-