पाटोदा (गणेश शेवाळे) महाराष्ट्रात सत्तेची चावी सर्व सामान्य बहुजन घटकाच्या हातात यावी म्हणून वंचित बहुजन आघाडी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून राज्यभरात सत्ता संपादन कार्यकर्ता मेळावा होत असून राज्यभरात सध्या जिल्हा परिषद निवडणूक राजकीय वातावरण तापत असताना वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा होत असल्यामुळे बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलेले असून बीड जिल्ह्या मधील पाटोदा तालुक्यातील कुसळंब येते पहिला वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा होत असून या मेळाव्यासाठी बीड जिल्हा प्रभारी किसन चव्हाण,तक्रार निवारण समिती महाराष्ट्र अध्यक्ष विष्णू जाधव,मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे,

यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे यांच्या अध्यक्षतेखाली तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर, उपजिल्हाध्यक्ष गोरख झेंड,बबनराव वडमारे, पक्ष निरक्षक अजय सरवदे,बालाजी जगतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कुसळंब येते सोमवारी दिनांक 10 /10/ 2022 रोजी संकाळी अकरा वाजता होणार असून वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन मेळाव्यास तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, तालुका महासचिव राहुल शिरोळे यांनी केले आहे