बँकेत वीज नसल्याने काम काज ठप्प ..

"आडुळ येथील भारतीय स्टेट बँकेतील प्रकार"

औरंगाबाद/पैठण तालुक्यातील आडुळ येथील भारतीय स्टेट बँकेत (दि.१)रोजी सकाळ पासून बँकेत वीज पुरवठा बंद असल्यामुळे व्यवहार थप्प पडून काम काज बंद पडले असल्यामुळे या शाखेत येणाऱ्या खेडयापाड्यातुन आलेल्या ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.मात्र दुपारी दीड वाजेच्या सुमारास खंडित असलेला विज पुरवठा पुर्ववत सुरु झाल्याने बँकेत गर्दी उसळल्याने एकच गोंधळ उडाला.

ग्राहकांना पासबुक छपाई,पैसे काढणे,पैसे भरणे,ऑनलाईन रक्कम पाठवीने अशी कोणतेही काम करता आली नाहीत. आज मंगळवारी नागपंचमीचा सण असल्याने बँकेत पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीकांची गर्दी होती लाईट नसल्याने नागरिकांना नाहक सकाळ पासून हेलपाटे मारावे लागले.ग्राहक बँक पासबुक छपाईसाठी बँकेत गेले असताना संगणकच बंद असल्याने त्यांना पुन्हा माघारी जावे लागले. काहींचे पेन्शन जमा झाली,आहे की नाही हे समजू शकले नाही.बँक कधी पूर्ववत चालू होईल याची खात्रीशीर माहिती अधिकाऱयांकडून मिळत नसल्याने दिवसभर बँक बंद असणार का असा प्रश्न नागरिकांना होत आहे.

 चौकट : आडुळ शाखेतील कर्मचार्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की ट्रान्सफार्मर बंद असल्याने शाखेतील काम काज लाईट आल्यावरच सुरु होईल असे सांगितले.

      (छायाचित्र : काकासाहेब लेंडे)