पाटोदा : पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी येथील श्री. अण्णाभाऊ खंडू काकडे वय 68 वर्षे हे दि 07 ऑक्टोंबर 2022 वार-शुक्रवार रोजी दुपारी 1.00 वाजता शेतात गुरे चारत असतांना पाठीमागुन येवुन बिबटयाने जोरदार हल्ला केला. या हल्यात ते जखमी झाले.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

बिबटयाने चावा घेतल्याने त्यांच्या डाव्या पायाला मोठी जखम झ या हल्यात हे वयोवृध्द शेतकरी भयभीत झाल्याने त्यांनी आरडाओरडा केला. मोठयाने ओरडल्याने व त्यांची गुरे ही बिबटयाच्या दिशेने धावल्याने ते या हल्यातुन बचावले. त्यांच्या ओरडन्याने शेजारील शेतकऱ्यांनी त्यांना उपचारार्थ नायगाव मयुर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्यांच्या पायाला 8 टाके पडले व ते गंभीर जखमी झालेले आहेत.

या हल्याची कल्पना संबंधीत वनविभाग व वन्यजिव विभागास देण्यात आलेली असून अद्याप ही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या बिबटयाच्या हल्यात जखमी असलेले आण्णाभाऊ काकडे यांना तात्काळ वन विभागाने मदत करावी तसेच नायगांव (मयुर) अभयारण्य परिसरात बिबटयाचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांनी शेतात जातांना आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन नायगांव (मयुर) चे सरपंच सय्यद शाहेद यांनी केले आहे.