संगमेश्वर : तालुक्यातील धामणी गावातील वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी धामणी ग्रामपंचायतीची सदस्या म्हणून युवती बिनविरोध निवडून आलेली आहे. त्या युवतीचे नाव मान प्रणिता वामन घाणेकर असे आहे. वयाने सर्वात लहान सदस्या म्हणून धामणी ग्रामपंचायतीत ती कार्यरत आहे.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

वाणिज्य शाखेतून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन वयाच्या पंचविसाव्या वर्षी प्रणिता घाणेकर हिला ग्रामपंचायत सदस्या होण्याचा बिनविरोध मान मिळाला आहे. गावच्या विकासासाठी काहीतरी करावे या उद्देशाने प्रणिता सतत धडपडत होती. सुदैवाने काया वॉर्ड महिलांसाठी राखीव झाला. प्रत्येक नागरिकाने प्रणिता घाणेकरवर विश्वास ठेवून तिला बिनविरोध निवडून दिले. आपल्या गावच्या महिलांसाठी ग्रामपंचायतीमार्फत जास्तीत जास्त योजना राबविण्याचा प्रणिता घाणेकरने संकल्प केला आहे. धामणी गावातील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी तिची धडपड सुरू आहे. गाव पॅनेलच्या माध्यमातून प्रणिता बिनविरोध निवडून आली आहे. 

एका शो रूममध्ये नोकरी करून गावाच्या विकासासाठी आवश्यक असेल तेवढे काम करण्याची जबाबदारी प्रणिता घाणेकरने स्वीकारली आहे.महिलांना रोजगार देण्यासाठी तिने घेतलेल्या भूमिकेला सहकारी सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. विविध उपक्र म धामणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यशस्वीरित्या राबवून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार प्रणिता घाणेकर यांनी केला आहे. धामणी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले काम प्राधान्याने पूर्ण करण्याची जबाबदारी प्रणिताने स्वीकारली आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन महिला सक्षमीकरणाची चळवळ अधिक गतीने राबविण्यासाठी प्रणिता घाणेकरने पुढाकार घेतला आहे. केंद्र, राज्य शासनाच्या महिलांसाठी असलेल्या सर्व योजना धामणी गावात राबविण्यासाठी प्रणिता घाणेकर हिने पुढाकार घेतला आहे.