पाथरी(प्रतिनिधी)तालूक्यातील मौजे उमरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात शुक्रवार ७ ऑक्टोबर रोजी पालकांच्या ,बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षपदी रमेश बिजुले तर उपाध्यक्षपदी विष्णू कोल्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

      पाथरी तालूक्यातील मौजे उमरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या कार्यकारणीचा कालावधी संपल्याने २०२२ ते २४ या चालू वर्षासाठी नविन कार्यकारणी निवडी संदर्भात जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पालकांच्या बैठकीचे आयोजन शुक्रवार ७ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. यावेळी सर्वानुमते पालकांमधून पत्रकार रमेश धोंडीबा बिजुले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी विष्णू राजेभाऊ कोल्हे यांची तर, सदस्य म्हणून सौ. बालीका बालासाहेब कोल्हे, सौ. रेणूका विलास कोल्हे, सौ. सत्यभामा भिमराव शेळके,शे. रब्बाना शे. अनिस, सौ. प्रणिता गोपाळ कोल्हे, सौ. सौमित्रा रामा कोल्हे, राम संपत्ती कोल्हे,रतन बालासाहेब कोल्हे, कल्याण सावंत दाभाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी माजी जि.प. सदस्य सुभाष कोल्हे, शिवसेना तालूका प्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, युवक कॉग्रेस तालूका अध्यक्ष डॉ.महेश कोल्हे, माजी सदस्य दत्ता बिजुले, बापुराव कोल्हे, वैजनाथ कोल्हे, चेअरमन विठ्ठल कोल्हे, अनिल कोल्हे, प्रकाश कोल्हे, सुदाम बिजुले, राजेभाऊ कोल्हे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.