भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांची मुलींच्या वसतिगृहाला सदिच्छा भेट

संगमेश्वर : तालुक्यातील कोळंबे परिसर विदया प्रसारक मंडळ या संस्थेने स्वयंम् अर्थसहाय्यीत मुलींचे वसतिगृह कोळंबे येथे ग्रामीण भागामध्ये सुरु केले आहे. या वसतिगृहाध्ये सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये रायगड जिल्हयातील आदिवासी भागातील शिक्षणापासून वंचित असलेल्या ७ विदयार्थिनीनी तर रत्नागिरी जिल्हयातील ११ मुलींनी प्रवेश घेतला आहे. या मुलींच्या वसतिगृहाला भाजप प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी कार्यकर्त्यांसह भेट दिली. दरम्यान वसतिगृहाची पहाणी करुन सर्व अडचणी समजून घेतल्या व रोख रक्कम एक लाख रुपयांची देणगी दिली. तसेच श्रीमती क.पा. मुळये हायस्कूलला १० संगणक संच देण्याचे त्यांनी कबूल केले आहे.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अनिल घोसाळकर, बापू सुर्वे, कोळंबे संस्थेचे अध्यक्ष नयन मुळये, सचिव दिलीप मुळये, मुख्याध्यापक संजय मुळये सर्व शिक्षक व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.