बलभीम नगर, पालवण रोड बीड येथे आज ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ..

  बोधचार्य सदाशिव कांबळे सर यांच्या उपस्थित सर्वप्रथम महिला मंडळाकडून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले .. यानंतर धम्म ध्वज वंदना व २२ प्रतिज्ञांचे वाचन करण्यात आले .. यानंतर बोधिवृक्षाची पूजा करून नियोजित जागा बुद्ध विहार या फलकावर पुष्पहार घालून तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्प व पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले ..

  यानंतर त्रिशरण,त्रिरत्न वंदना,पंचशील,भीम स्मरण,भीम स्तुती व शेवटी सरणतय वंदनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात 

  सदरील कार्यक्रमास परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक,धम्म उपासक-उपासिका तसेच बालक-बालिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ..

  कार्यक्रमाचे आयोजन व कार्यक्रम यशस्वीतेसाठी:-आयु अंजली तेजस वडमारे, सुजाता वाघमारे मॅडम,जयश्री वडमारे, सरिता खेमाडे, निकिता भोले, मीना शिंदे, सीमा भालेराव, कमलबाई अंकुटे वनिता अंकुटे, स्वाती वडमारे, शकुंतला ससाणे मॅडम, दीपाली जाधव, शिवकन्या खेमडे, शालनबाई धन्वे सुशाला साळवे, पंचफुला वाघमारे, कुसुमबाई साळवे, हेमा वडमारे, संघमित्रा पवार, अर्चना सोनवणे,जयश्री गवळी,स्वाती वाघमारे समस्त बौद्ध उपासिका व बौध्द उपासक यांच्या उपस्थिती 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी आदींनी परिश्रम घेतले..