पोलीस ठाणे बिडकीन हद्यीत वृध्देचा खुन करुन दागिणे लांबविणाऱ्या चोरटयांचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश..

बिडकिन प्रतिनिधी:-

दिनांक ०९/११/२०२२ रोजी फिर्यादी नामे मंडाबाई पांडूरंग आघम वय ५५ वर्ष रा. बिडकीन ता. पैठण यांनी फिर्याद दिली की, दिनांक ०९/११/२०२२ रोजी मी घरी असतांना सकाळी ०७:३० वाजेच्या सुमारास माझ्याकडे रिक्षा चालक आला व त्याने मला सांगितले की, तुमच्या बहिणीच्या घराला कुलूप लावलेले आहे. आम्हांला आज बाजारासाठी जाणे होते, परंतु त्या घरी नाही असे सांगितल्याने मी माझी बहिण जानकाबाई हरदास महालकर हिच्या घरी जावून पाहिले असता तिच्या घराला कुलूप लावलेले दिसले व तिच्या घरात जाण्यासाठी असलेला बाजुचा दरवाजा मला उघडा दिसला म्हणून मी घरात जावुन पाहणी केली असता मला माझी बहिण झोपती त्या घरातील एक लोखंडी संदूक उघडी दिसली व त्यातील साड्या व कागदपत्रे अस्ताव्यस्त पडलेले दिसले म्हणुन मी माझ्या नातेवाईकांना फोन करुन नातेवाईकांना बोलावून घरात बहिणीचा शोध घेतला असता माझी बहिण हि पाठीमागील खोलीत पडलेली दिसली म्हणुन जवळ जावुन पाहिले असता ती मयत झालेली दिसली तिच्या कानातील सोन्याचे कुडके दिसले नाही. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने माझ्या बहिणीच्या कानातील सोन्याचे कुडके चोरुन तिचा खुन केला. वगैरे मजकुराचे फिर्यादवरुन पोलीस ठाणे बिडकीन येथे गुरनं ५०४ / २०२२ कलम ३०२ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.

मा. पोलीस अधीक्षक श्री. मनिष कलवानीया यांना सदर गुन्हयाची माहिती मिळताच त्यांनी सदर गुन्हयाचे घटनास्थळास भेट देऊन सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता स्थानिक गुन्हे शाखेस सदर गुन्हयाचा समांतर तपास करणे बाबत आदेशीत केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक व तांत्रीक विश्लेषणा आधारे खात्रीलायक माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी नामे (१) राजु छबुराव साळवे वय ३६ वर्ष रा. कातपुर ता. पैठण जि. औरंगाबाद ह.मु. ग.नं. ०६ फुले नगर, उस्मानपुरा, औरंगाबाद (२) दिलीप गोविंद हिवाळे वय ४५ वर्ष रा. जायकवाडी ता. पैठण ह.मु. नारेगांव, औरंगाबाद (३) शिवाजी सुखदेव खरात वय ३२ वर्ष रा. पिराची पिंपळवाडी ता. पैठण ह.मु. रमा नगर, चितेगांव ता. पैठण (४) देविदास उर्फ बाली सर्जेराव गलाटे वय ५१ वर्ष रा. चवा ता. पैठण ह.मु पांगरा रोड, चितेगांव ता. पैठण यांनी केल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन विचारपुस केली असता वरिल सर्व आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अधिक माहिती घेतली असता नमुद आरोपींनी पोलीस ठाणे बिडकीन हधीत घरफोडीचा गुन्हा केल्याचे तसेच राजु छबुराव साळवे याच्याकडे असलेल्या मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने सदर मोटार सायकल हि सुमारे तिन महिण्यांपुर्वी शिवाजी नगर मधील भारत नगर, औरंगाबाद येथुन चोरी केल्याचे व सुमारे तिन महिण्यांपुर्वी पोलीस ठाणे चिकलठाणा हधीतील चितेपिंपळगांव येथे एका वृद्ध महिलेला अडवुन तिच्या गळयातील सोन्याचे दागिणे चोरी केल्याची कबुली दिली. नमुद आरोपींना सदर गुन्हयाचे पुढील तपासकामी पोलीस ठाणे बिडकीन यांच्या ताब्यात देण्यांत आले असुन पुढील तपास पोलीस ठाणे बिडकीन हे करीत आहे.

सदरची कामगिरी श्री. मनिष कलवानीया, पोलीस अधीक्षक, सुनिल लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, विशाल नेहूल, उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, सपोनि रामचंद्र मुंजे, संतोष माने, पोउपनि विजय जाधव, प्रदीप तूबे, सुजाता गुंजाळ सफी सय्यद झिया, बाळू पाथ्रीकर, दगडू जाधव पोह श्रीमंत भालेराव, संतोष पाटील, संजय घुगे, दिपेश नागड़ारे, नामदेव सिरसाठ, प्रमोद खांडेभराड, लहू थोटे, जनाबाई चव्हाण पोना वाल्मीक निकम, नरेंद्र खंदारे, विजय धुमाळ, गणेश गांगवे, शेख नदीम, दिपक सुरोशे, उमेश बकले, परमेश्वर आडे, पुष्पांजली इंगळे, पोकों रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे, राहूल गायकवाड, आनंद घाटेश्वर, संतोष डमाळे, संजय तांदळे, योगेश तरमाळे, जिवन घोलप यांनी केली आहे.