महात्मा गांधी जयंती व स्व. लाल बहादूर शास्त्री जयंतीदिनी तरणखोप ग्रामपंचायतीमधील धावटे गावात माजी आमदार धैर्यशील दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पाटील (काका) यांच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या ३.०० लाखाच्या निधीतून शेखर देवराम आवळे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन व प्राथमिक शाळा दुरुस्ती कामाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच श्री गणपती मंदिरासमोरील शेडचे बांधकाम डी. बी. पाटील (काका) यांच्यामार्फत केले गेले. त्याशिवाय व्यायामशाळेची दुरुस्ती व शेखर आवळे यांच्या रस्त्याला अपुरा पडणारा निधी लवकरच पुरविला जाऊन उर्वरित सर्व कामे पूर्ण करण्यात येतील आणि व्यायाम शाळेतील अपूरं साहित्य डी. बी. पाटील (काका) यांच्याकडून पुरविलं जाईल, असे जाहीर करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास दिनेश पाटील, सरपंच सुनिल पाटील, ग्रा. पं. सदस्या दिया हेमंत शेळके, प्रमुख कार्यकर्ते दिलीप शेडगे,नितीन शेळके,योगेश महाडिक,शेखर आवळे,संतोष खांडेकर, दिलीप निकम, रत्नाकर लांगी, संतोष पाटील, सखाराम पाटील, विठ्ठल शेडगे, नंदकुमार सकपाळ,संजू पाटील तसेच धावटे गावातील ग्रामस्थ, तरुण मंडळी उपस्थित होती.
सदर कार्यक्रम यशस्वी करणेसाठी दिलीप निकम, योगेश महाडिक, दिलीप शेडगे, नितीन शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले.