लायन्स क्लब ऑफ अलिबाग- मांडवा, अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशन, जिल्हा रुग्णालय-अलिबाग आयोजित अमितदादा नाईक पुरस्कृत महा आरोग्य शिबिराला खारेपाटातील सुमारे ५०० नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
सदर महा आरोग्य शिबिरात मोफत तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर जनरल, नेत्र, दंतरोग, अस्थीरोग, स्त्रीरोग, मधुमेह, इ. सी. जी., रक्त तपासणी अल्पदरात चष्मे वाटप ,प्रथम येणाऱ्या २५ रुग्णांची अल्पदरात मोतिबिंदू रुग्णांची डोळ्यांची तपासणी करून शस्त्रक्रीया
करण्यात येईल. यावेळी अनेक रुग्णांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली.
सदर महा आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉ. मेघा घाटे यांनी केले. तसेच अलिबाग मुरुड मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमित नाईक व अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.गणेश गवळी,डॉ संदेश पाटील,डॉ मकरंद म्हात्रे, डॉ रवी मोकल,डॉ प्रणाली पाटील सचिव, लायन्स क्लब मांडवा अध्यक्ष बी.एन.कोळी ,डॉ राजाराम हुलवण ,डॉ निशिकांत ठोंबरे,डॉ अनिकेत पाटील, डॉ .सोनाली नाईक ,
डॉ.निशिगंध आठवले ,डॉ मनोज पाटील, डॉ.आदेश मोकल,डॉ स्वप्नील पाटील,सदर महा आरोग्य शिबिर म. गांधी विद्यालय, हाशिवरे या ठिकाणी अमितदादा नाईक मित्रमंडळ पुरस्कृत सारळ- म्हात्रोळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
महात्मा गांधी विद्यालय, हाशिवरे येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधोपचार वाटप शिबीर आयोजित करण्यात आले .
*सदर शिबिरासाठी असोसिएशन चे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र म्हात्रे , डॉ.राजेंद्र मोकल , डॉ. संदेश पाटील , तसेच हाशिवरे परिसरातील सर्व आपले अम्मा डॉक्टरस तर्फे सहकार्य मिळाले.डॉ. प्रसाद दाभोलकर व स्पोर्ट सेक्रेटरी डॉ. हुलवण यांनी मोलाचे योगदान केले. सदाशिबराच्या वेळी मार्गदर्शन करताना आयोजक अमित नाईक म्हणाले की, खारेपाटातील तळागाळातील गोरं गरीब नागरिकांना व समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना आरोग्यसेवा यापुढेही मिळण्यासाठी आपण सहकार्य करू यावेळी लायन्स क्लब अलिबाग-मांडवा सर्व पदाधिकारी व आरोग्य शिबिरासाठी उपस्थित असलेल्या २५ डॉक्टरांचे सन्मान चिन्ह देऊन अमित नाईक यांच्या हस्ते सर्व गौरव करण्यात आला.
सदर आरोग्य शिबिराच्या वेळी आवर्जून उपस्थित राहिलेले रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मधुकर पाटील ,पदाधिकारी विजय मोरे व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच आरती मोकल, रेवस सरपंच मच्छिंद्र पाटील, विद्याधर ठाकूर, शंकर पाटील, उमेश गावंड व खारेपाटातील सरपंच, उपसरपंच ,सदस्य विविध सरातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी अनेक रुग्णांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतलेल्या डॉक्टरांचे व आयोजकांचे कौतुक केले. लाइन्स क्लब च्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.