एक दिवस माझ्या बळीराजा साठी अभियान

पाचोड/ तालुका कृषि अधिकारी पैठण अंतर्गत मंडळ कृषि अधिकारी पैठण ढोरकिन येथिल शेतकरी नवनाथ नरवडे यांचे घरी भेट घेऊन त्यांना येणाऱ्या शेती, कर्ज, सामाजिक सुरक्षा, विमा समस्या विषयक चर्चा केली, तसेच मोसंबी कापूस व सोयाबीन पिकाची पाहणी करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुका कृषि अधिकारी पैठण संदीप शिरसाठ, मंडळ कृषि अधिकारी पैठण विशाल साळवे व विमा प्रतिनिधी राम घेगडे व शेतकरी कुटुंबीय होते.