उरण तालुक्यातील जसखार ग्रामपंचायतीच्या मासिक सभे मध्ये आई रत्नेश्वरी देवीच्या मंदिराच्या मागून चालू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे मंदिराला आणि घरांना हादरे बसून मोठ्या प्रमाणात तडे जात आहेत. या करता ग्रामपंचायत कमिटी व ग्रामसुधारणा मंडळ जसखार आणि ग्रामस्थ जसखार यांनी या कामासंबंधी प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणी करिता मंगळवारी दिनांक ०४.१०.२०२२ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता मंदिरा जवळ जाऊन काम बंद करण्याचा ठराव पास केला.व या करता गावातील नागरिकांना पोलिस संरक्षण मिळवण्याकरता एक पत्र न्हावा शेवा पोलीस निरीक्षक यांना दिला. त्यामधे जसखार ग्रामस्थांकडून काही मागण्या होत्या.त्या मागण्या खालीलप्रमाणे
१) मागील ४ वर्ष उड्डाण पुलाच्या अनियोजित कामामुळे गावात पूरपरीस्थिती निर्माण होऊन गावातील लोकांचे नुकसान झाले त्याची आर्थिक नुकसान भरपाई मिळावी.
२) उड्डाण पुलाच्या कामामुळे हादरे बसून ज्या घरांना नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळावी.
३) उड्डाण पुलामुळे आई रत्नेश्वरी देवीच्या मंदिराची नुकसानीची जबाबदारी जे. एन. पी. टी. प्रशासनाने लेखी घ्यावी.
अशा प्रमुख ३ मागण्या आहेत.या मागण्या अजूनही प्रलंबितच आहेत. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
जे. एन. पी.टी. प्रशासनाने या उड्डाण पुलाचे काम चालू केले तेव्हा गावा मध्ये पब्लिक हेरिंग, चावडी वाचन, ग्राम पंचायत कडून नाहरकत दाखल अशा कुठल्याही परवानगी न घेता किंवा गावाचा विचार न करता हा काम चालू केला आहे. या करता ग्राम पंचायतीने गावाच्या संरक्षण करता मागणी केलेल्या पत्राच्या आधारे न्हावा शेवा पोलीस निरीक्षक मधुकर भाटे यांनी उलट गावातील नागरिकांना कलम १४९ प्रमाणे नोटीस देऊन असे सूचित केले की मंगळवार दिनांक ०४.१०.२०२२ रोजी मंदिरा जवळ ५ किंवा ५ पेक्षा जास्त लोक जमली तर त्यांच्यावर कलम ३७ (१)(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल. आणि मंगळवार दिनांक ०४.१०.२०२२ रोजी सकाळी १०:०० वाजल्या पासून मंदिर समोर उड्डाण पुलाच्या ठेकेदारा च्या संरक्षणा करता स्वतः न्हावा शेवा पोलीस निरीक्षक मधुकर भाटे यांच्यासह ५० पोलीस हवालदारांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.ही बाब अन्यायकारक असल्याचे आंदोलन कर्ते तथा ग्रामस्थ ,देवीचे भक्तांनी सांगितले. आमचा लढा कायदेशीर, लोकशाही मार्गाने सत्याच्या बाजूने असून देखील आम्हाला न्याय मिळत नाही. असी खंतही व्यक्त केली.या बाबतीत न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर भाटे यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. गावातील लोकांध्ये मंदिराविषयी जणजागृती करण्यासाठी नवरात्रीच्या शेवटच्या रात्री गावातील युवा सामाजिक संस्था तसेच ग्रामस्थांनी पोस्टर बाजी करून अनोख्या पध्दतीने आंदोलन केले.