बेलापूर किल्ल्यावर दसरा पूजन व दुर्गदर्शन मोहिम संपन्न.
बेलापूर किल्यावर बुधवार दि ५/१०/२०२२ रोजी
सकाळी ठिक - ८:०० वा. सह्याद्री प्रतिष्ठान पनवेल विभागातर्फे विजयादशमी दसऱ्याच्या निमित्ताने दुर्गपूजनाचे आयोजन करण्यात आलं होते . या कार्यक्रमात बेलापूर किल्याची स्वच्छता करून हिंदू संस्कृतीचा वारसा जपत किल्ल्याला तोरण लावण्यात आले .या वेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे २६ दुर्गसेवक उपस्थित होते.आधी तोरण गडाला मग माझ्या घराला या घोषणेने दसरा पूजन व मोहीम यशस्वी झाली.
सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी
सह्याद्री प्रतिष्ठानचे सचिन ठाकूर , मयूर टकले,गौरव दरवडा, सुधीर पवार ,राकेश,भीम शिलकर , आदेश पाडेकर,सौरभ ठाकूर यांच्यासह इतर उपस्थिती पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
इ. स. १५६० ते १५७० मध्ये जेव्हा पोर्तुगीजांकडून हा प्रदेश ताब्यात घेतला, तेव्हा सिद्दींनी हा किल्ला पनवेल खाडीच्या तोंडाजवळ, एका टेकडीच्या माथ्यावर बांधला. १६८२ मध्ये, हा किल्ला पोर्तुगीजांनी परत ताब्यात घेतला आणि सिद्दींनी नियंत्रित केलेल्या बेलापूरजवळील प्रदेशांना (त्या काळात शाबाज म्हणून ओळखले जाणारे) त्यांनी ताब्यात घेतले.
१७३३ मध्ये चिमाजी अप्पाच्या नेतृत्वात मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून किल्ल्यावरील ताबा मिळविला. पोर्तुगीजांकडून यशस्वीरित्या किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यात आल्यास त्यांनी जवळच्या अमृतैश्वर मंदिरात बेलीच्या पानांचा हार घालेल असा प्रण केला आणि विजय मिळाल्यावर त्यांनी किल्ल्याला बेलापूर किल्ला असे नामकरण केले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन चार्ल्स ग्रेन याने २३ जून १८१७ रोजी ताब्यात घेईपर्यंत मराठ्यांनी या प्रदेशावर राज्य केले. ब्रिटीशांनी त्यांच्या परिसरातील कुठलाही मराठ्यांच्या वर्चस्वाखाली असलेला गड मोडून काढण्याच्या धोरणाखाली हा किल्ला अर्धवट नष्ट केला. त्यामुळे ऐतिहासिक परंपरा असलेल्या या किल्ल्यावर दसरा साजरा करण्यात आल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे सौरभ ठाकूर यांनी दिली.