जिल्हा अधिकारी कार्यालय बीड येथे शाळा भरवणार आम आदमी पार्टी माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला इशारा
बीड जिल्ह्यातील पिंपळगाव (दाणी) तालुका आष्टी या गावच्या मुलां मुलींनी शिक्षकांनी रस्ता व पूल नसल्यामुळे शाळेत जाता येत नाही म्हणून तहसील कार्यालयावर शाळा भरवली तसेच महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळा कमी पटलाचा भाना दाखवून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा निषेध काम लवकर झाले नाही तर आम आदमी पार्टी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शाळा भरवणार या विषयाचे निवेदन आणि मुख्यमंत्री विभागीय आयुक्त यांना माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे की बीड जिल्ह्यातील पिंपळगाव (दाणी) तालुका आष्टी जिल्हा बीड या गावास रस्ता नसल्यामुळे या गावचे मुले व मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि तेही फक्त आणि फक्त प्रशासनाच्या कामचुकार व निर्लज्ज धोरणामुळे होत आहे असा विषय बीड जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये होत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे या गोष्टीचा जितका निषेध करावा तेवढा कमीच आहे आम आदमी पार्टी या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहे व जर हे काम लवकरात लवकर झाले नाही तर आम आदमी पार्टी या विषयाला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी शाळा भरवली जाईल महाराष्ट्रातील शिक्षणाची वाईट परिस्थिती चालू आहे सर्व शिक्षण हे शिक्षण माफियाच्या हातामध्ये जाताना दिसत आहे जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या बंद हो पडत आहेत आणि महाराष्ट्र शासन निस्त बघायची भूमिका घेत आहे ज्या महाराष्ट्रामध्ये कमी पटलाच्या शाळा आहेत त्या शाळा बंद करण्याचे धोरण म्हणजेच गोरगरिबांच्या शिक्षणाचा हक्का पासून दूर ठेवण्याचं धोरण राबवत आहे की काय असे वाटत आहे या निषेधार्थ आम आदमी पार्टी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे या धोरणाकडे व शैक्षणिक धोरण सुधारण्यासाठी लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे शाळा भरवणार याचे सर्वस्व जबाबदारी आपल्या कार्यालयाची असेल असे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत पाठवण्यात आले यावेळी माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी शहराध्यक्ष सय्यद सादेक कैलास चंद पालीवाल रामभाऊ शेरकर भीमराव कुठे तालुकाध्यक्ष अजून खान उपाध्यक्ष तालुका बाबुभाई टॅक्सी चालक संघटना महादेव प्रभाळे राहुल शिंदे माऊली शिंदे विनायक शिंदे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते