कन्नड तालुक्यातील नागद बसस्थानकाजवळील गडदगड  नदीत ३२वर्षिय तरुणांच्या बुडून मृत्यू झाला . शनिवारी  दि . १ ऑक्टोबर  सकाळी ८.०० वाजता ही घटना उघडकीस आली . पिंटू पोपट गायकवाड ( रा . ओझर , ता . चाळीसगाव , जि . जळगाव ) असे मयताचे नाव आहे . सध्या तो कन्नड तालुक्यातील पांगरा गावात राहात होता . ग्रामस्थांनी त्यास पाण्यातून बाहेर काढत नागद आरोग्य केंद्रात दाखल केले असता आरोग्य अधिकारी यांनी तपासून मयत घोषीत करण्यात आले यावेळी येथेच त्याचे शवविच्छेदन करण्यात आले तसेच याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली