रत्नागिरी : रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची संजीवनी दिव्यांग विकास संघटनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी ( दिनांक ३ ऑक्टोबर रोजी) भेट घेतली. यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
दरम्यान दिव्यागांना स्वबळावर उभे राहण्यासाठी वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन करावे. तसेच दिव्यांगांचे जीवनमान उंचाविणे, दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक साहाय्य करणे, दिव्यांगांना त्यांच्या पायावर उभे राहण्याकरिता विविध योजना राबविण्यासाठी तत्परता दाखवावी. अशी विनंतीपूर्वक तोंडी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
यावेळी संजीवन दिव्यांग विकास संघटनेचे अध्यक्ष राकेश कांबळे, सचिव नंदकुमार कांबळे, कोषाध्यक्षा राखी कांबळे, आकाश कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.