औरंगाबाद : रिक्षाचा प्रवास आजपासून महागणार , असे राहतील नियम शहरात रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजपासून ज्यादा दराने प्रवास करावा लागणार आहे . गेल्या सात वर्षांपासून रिक्षा मीटर दरवाढ जाहीर करण्यात आली नव्हती . यंदा ही मीटर दरवाढ करण्यात आली आहे . पहिल्या दीड किलोमिटरसाठी २६ रुपये दर , आणि त्यानंतर प्रति किलोमिटरसाठी १८ रुपये दर जाहीर करण्यात आले आहेत . या दरवाढीबाबतचा आरटीओ विभागाकडून टेरिफ जाहीर करण्यात आला आहे . पूर्वीच्या प्रवास भाड्यापेक्षा काही मार्गावर ३० ते ४० टक्के महाग दराने औरंगाबादकरांना रिक्षाचा प्रवास करावा लागणार आहे . ' आरटीओ ' ने जाहीर केलेल्या टेरिफ कार्डवर रिक्षाचालकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत