वसीम भैय्या मित्र मंडळाचे उपक्रम*

 जिंतूर/प्रतिनिधी

   

 जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दिनांक 2 ऑक्टोंबर रविवार रोजी वसीम भैय्या मित्र मंडळाच्या वतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. वसीम भैय्या मित्र मंडळ हे परिसरात सदैव सामाजिक उपक्रम राबवत असून सर्वसामान्यांचे अडचणी दूर करण्यासाठी तात्पर्य असते. मागील अनेक वर्षापासून या मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर, फळ वाटप, ब्लांकेट रग शाली वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गरीब मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत यासह अनेक छोटे मोठे उपक्रम कोणत्या ना कोणत्या निमित्ताने राबविले जात आहे. दिनांक 2 ऑक्टोंबर रविवार रोजी ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.यावेळी मुसवीर खान पठाण, सरपंच वहीद खान पठाण, डॉ.रमेश गबाळे, सुधाकर आप्पा संगेकर, शेख मुर्तुजा, रणवीर अंभुरे, दीपक प्रधान, बाबू खान पठाण, शेख फिरोज, खुद्दूस गुत्तेदार, यांच्यासह वसीम भैय्या मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 फोटो ओळी 

बोरी येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी मुसवीर खान पठाण, सरपंच वहीद खान पठाण, डॉ.रमेश गबाळे, सुधाकर आप्पा संगेकर, शेख मुर्तुजा, रणवीर अंभुरे, दीपक प्रधान, बाबू खान पठाण, शेख फिरोज, खुद्दूस गुत्तेदार, यांच्यासह वसीम भैय्या मित्र मंडळाचे पदाधिकारीदिसत आहे.