शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना.. ठाकरे सोडून शिवसेना नाही. आम्ही सदैव माननीय उद्धव साहेब ठाकरे व मनानिय आदित्य साहेब ठाकरे यांच्या सोबत असल्याचे सांगत गेल्या 18 दिवसांपासून बीड ते शिवतीर्थ (मुंबई) पर्यंत निष्ठायात्रा शिवसेनेचे माजी बीड तालुकाप्रमुख उल्हास गिराम यांनी पायी चालत सुरू केली असून आज ही यात्रा खारघर पर्यंत पोहोचली आहे.

  आज दिनांक 02 ऑक्टोबर 2022 रोजी या यात्रेस 18 दिवस पूर्ण झालेले असून सलग 18 दिवसांपासून पायी चालत शिवसैनिक आपली निष्ठा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रती व्यक्त करत आहेत. शिवसेनेतील बंडाच्या अनुषंगाने ही निष्ठा यात्रा खूप महत्वाची ठरत असून निष्ठावंत शिवसैनिक 450 किलोमिटर पायी चालत स्वार्थासाठी बंड केलेल्यांना नैतिकदृष्ट्या चांगलेच उत्तर देत आहेत.