रत्नागिरी : हिंदूहृदसम्राट वंदनीय कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने आज गोळप- पावस जि.प. गटातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या युवासेना तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी नियुक्तीपत्र देऊन जाहीर केल्या.
गोळप जि. प. गटाच्या उपविभाग युवधिकारी पदी श्री संदीप गुळेकर, कोळंबे शाखा युवाधिकारी पदी श्री मंदार गावडे (वार्ड १), श्री अमेय वैद्य (वार्ड २), श्री गिरीश ठीक ( वार्ड नो ३), पावस शाखा युवाधिकारी पदी अभिषेक शिंदे (वार्ड नो ५), नाखरे शाखा युवाधिकारी पदी प्रथमेश पावसकर (वार्ड२), कोळंबे उपशाखा युवाधिकारी पदी श्री विराज लाखण(वार्ड१), श्री पंकज पवार (वार्ड २), श्री शुभम पालये(वार्ड ३) यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी रत्नागिरी सिंधदुर्ग लोकसभा समन्वयक श्री प्रदीप बोरकर, सहसंपर्कप्रमुख मा राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके तालुकाप्रमुख प्रदीप (बंड्या) साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, महिला संपर्क प्रमुख नेहा माने, जिल्हा महिला संघटक वेदा फडके, युवासेना जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी, युवासेना उपजिल्हा युवधिकारी हेमंत (पिंट्या) खातू, महिला तालुका संघटक साक्षी रावणंग,तालुका युवधिकारी प्रसाद सावंत, उपतालुका युवधिकारी देवेंद्र अडके, विभाग युवाधिकारी श्रीकांत मेस्त्री,उपशहर युवधिकारी पारस पाटील, कॉलेज युनिट प्रमुख पारस साखरे यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.