संगमेश्वर : तालुक्यातील कुणबी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कुणबी समाजोन्नती संघ, संगमेश्वर, कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ, ग्रामीण शाखा देवरूख, आंबेड खुर्द व कुणबी सहकारी पतसंस्था, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
शहरातील कुणबी भवन येथे सकाळी १०.३० वा. मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये सन २०२१ २२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी, बारावीमध्ये अनुक्रमे ८० व ६५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त तसेच पदवी परीक्षा पास होणारे विद्यार्थी, नवोदय विद्यालयात उत्तीर्ण झालेले, वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांना गौरविण्यात येणार आहे.
दहावी, बारावी, पदवी परीक्षेचे निकाल हायस्कूल व महाविद्यालय यांच्याकडून प्राप्त करून घेऊन त्यांना निमंत्रण पत्रे पाठविण्यात येत आहेत. तालुक्यातील सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्राची प्रत ५ रोजी पर्यंत सादर करावी. याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, तसेच या कार्यक्रमास कुणबी भवन देवरूख येथे उपस्थित रहावे, असे आवाहन सुरेश (भाऊ) कांगणे, रवींद्र सुवारे, शिवाजी पाष्टे यांनी केले आहे.