पाथरी(ता.प्रतिनिधी)पाथरी तालुक्यातील वाघाळा जिल्हा परिषद शाळेच्या जागे संदर्भात अपर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निकाला विरुद्ध गटशिक्षणाधिकारी व शाळेच्या वतीने विभागीय आयुक्तांकडे करण्यात आलेल्या अपील नंतर
याप्रकरणी पुढील सुनवाई होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे .
वाघाळा जिल्हा परिषद शाळेच्या महसुली नोंदीवरून मागील दोन वर्षापासून वाद सुरू आहे .जिल्हा परिषद शाळेने याप्रकरणी उपविभागीय अधिकारी पाथरी यांच्याकडे धाव घेतल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होत शाळेच्या बाजूने निकाल लागत संपूर्ण जमिनीचा मालकी नोंद शाळेच्या नावे करण्याचा आदेश निघाला होता .त्यानंतर या निकाला विरुद्ध अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केल्यावर सुनावणी झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळा व अपीलकर्त्यांना जमिनीची विभागणी करून महसूल ला तशी नोंद घेण्याचे आदेश देण्यात आले होते .परंतु याप्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा परिषद शाळा व गटशिक्षणाधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे या निकालाला स्थगिती देत सुनावणी घेण्याची मागणी केली होती .त्यानुसार विभागीय आयुक्तांनीअपर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली आहे .