कोचिंग क्लासेस चालकाच्या खात्यातुन १ लाख लांबविले
बीडदि . अनिल घोरड
- ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार थांबता थांबेनात . दररोज अशा फसवणूकीचे गुन्हे पोलीसात दाखल होत आहे . मात्र त्याचा तपास नेमका कसाहोतो ? हेच अजुन समोर आलेले नाहीत . फसवणूकीचे प्रकार मात्र अजुनही वाढत आहे . बीडमध्ये एका खाजगी कोचिंग क्लासेस चालकाच्या खात्यातुन ९९ हजार ९९९ रूपयांची रक्कम परस्पर लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . बीड शहरातील प्रविणबाळकिसन बियाणीरा . विप्रनगर यांच्या खात्यातुन अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन फसवणूक करत ९९ हजार ९९९ रूपयांची रक्कम परस्पर हडप केली . दि . ३० जुलै रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्याबँक खात्यातुन अनोळखी इसमाने युपीआयद्वारे ही रक्कम परस्पर वळती करून घेत बियाणी यांची फसवणूक केली . या प्रकरणी बियाणी यांच्या तक्रारीवरून बीड शहर ठाण्यात अज्ञात व्यक्तीकडून गुन्हा दाखल झाला आहे .