हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने 48 तासात चार गंभीर होण्याची उकल करीत आरोपींना बेड्या ठोकल्या. अशी माहिती हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली.
ओमकार उर्फ खंड्या राजू शिंदे (वय 22 रा. वैदवाडी) असे अटक केलेल्या चे नाव असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून आठ गुन्हे उघडकीस आणून घेण्यातील वाहने हत्यारे मोबाईल व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली . रिक्षा चालकाच्या खुणातील आरोपी कृष्णा विठ्ठल रेकले (वय 27, रा.कवडी गाव टोल नाका लोणी काळभोर) याला दोन तासात अटक केली .तिसऱ्या घटनेमध्ये काळेपडल मधील निर्मळ टाऊनशिप येथे दुचाकी चालकाला धमकवणाऱ्या आकाश दीपक साठम (वय 21 रा. काळेपडळ) याला बेड्या ठोकल्या. तर चौथ्या घटनेमध्ये हॉटेल पिंगारा येथे आम्ही इब्राहिम तांबोळी( वय 24 रा. कुंजीरवाडी) याला धमकावून 24 हजार रुपये रोकड लुटणाऱ्या शुभम मोरे (वय 22 रा. शिवनेरी कॉलनी पापडे वस्ती भेकराईनगर) प्रसाद कांबळे (वय 21 रा.फुलेनगर विश्रांतवाडी) हेमंत चौगुले (वय 22 शिवरकर उद्यान वानवडी) यांना अटक केली. न्यायालयाने तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे