*जवाहर प्राथमिक विद्यालयात महात्मा गांधीलालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी*

          आज जवाहर प्राथमिक विद्यालयात भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर मते सर हे होते .सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

          यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाषणे केली. यामध्ये स्वानंद तम्मेवार ,रोहन गजाकोश, ज्ञानेश्वरी सांगळे, उत्कर्ष इखे, संघर्शा सांगळे, अथर्व घुगे, श्रावणी चोपडे, प्रथमेश जोशी, विश्वजीत साळवे, समर्थ ठोंबरे, विश्वजीत कवडे ,आरूशी थिटे ,श्रद्धा लिपणे, नंदिनी मोरे, राजवीर जगताप, धनश्री गायकवाड, उमरेन खान, यांनी भाषणे केली.  

         शेवटी अध्यक्षीय समारोपात बोलताना मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर मते सर यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधी यांच्या योगदानाबद्दल तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.

              या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अलका परणे यांनी केले तर आभार विष्णू रोकडे यांनी मानले. या कार्यक्रमास शाळेतील सहशिक्षक श्री. शिवाजी ठोंबरे, रामकिशन टाके, अमोल राऊत, ज्ञानेश्वर पोटे, पल्लवी तरटे, प्रियंका कापसे हे उपस्थित होते.