सराफा आपले दुकान बंद करुन पत्नीसह दुचाकीवरुन गावी जात असतांना पाठीमागून आलेल्या तिन दुचाकीस्वरांनी सराफाच्या डोक्यात लाकडी दांडा मारुण गंभीर जखमी केले. पत्नीलाही मारहाण करुन त्यांच्या जवळील 9 तोळे सोण्याच्या दागिण्यास रोख रक्कम लंपास केल्याची घटना बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दौलावडगाव ते बारव रस्त्यावरील केळपिंपळगावा जवळ घडली घटनेचे गांर्भीय लक्षात घेता पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी दोन पथके पाठवले आहेत.
आष्टी तालुक्यातील दौलावडगांव येथे पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील लेमकांत निवृत्ती दीक्षित व त्यांची पत्नी सुनीता दीक्षित यांचे सराफाचे दुकान असून दररोज ते करंजी ते दौलावडगाव असा मोटरसायकल वरून प्रवास करतात याचाच फायदा घेत बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दौलावडगाव ते बारव रस्त्यावरील केळपिंपळगाव जवळ पाठीमागून मोटरसायकलवरुन आलेल्या तिघा अज्ञात तरुणांनी दीक्षित यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांना खाली पाडले तसेच त्यांच्या पत्नीला देखील जबर मारहाण केली असून,डोक्याला गंभीर इजा झाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या जवळील रोख रक्कम 60 हजार रुपयांची तर 9 तोळे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहे. या घटनेमध्ये दीक्षित दांपत्य गंभीररित्या जखमी झाले असून परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ नगरला खाजगी रुग्णालयात दाखल केले.याबाबत अंभोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने हे करत आहेत.