कन्नड: राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. याचा राज्यातील अंदाजे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून आतापर्यंत जवळपास 4 हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. कन्नड तालुक्यातील शेतकरी सक्षम व्हावा तसेच येथील शेतकऱ्यांना कृषी योजनेचा लाभ मिळावा यासाठी तालुक्यातील अधिकाधिक गावांचा पोखरा योजनेत समावेश करण्यात येईल असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार नितीन पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे, शेख जावेद , मनोज पवार, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. मनोज राठोड, शेख ख्वाजा, वाल्मिकी लोखंडे, जिल्हा दूध संघाचे संचालक गोकुळसिंग राजपूत, जि.प.माजी उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे, जि.प.सदस्य धनराज बेडवाल , पांडुरंग घुगे, राजीव काका, कैलास आकुलकर, रामभाऊ ससे, कौतिक पवार, अशोक पवार, बाबासाहेब जाधव, राजुसेट चव्हाण, साईनाथ अल्हाड, अमोल पवार, राहुल वळवळे, मनोज देशमुख, अशोक पवार, शेख शाहिद आदिंसह शिवसेना , युवासेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती