गंगाखेड
अभिजीत जाधव हा केवळ आठ वर्षांचा गोड चिमुकला. तो इयत्ता दुसरीमध्ये शिकतो. घर ते शाळा आणि शाळा ते घर हा त्याचा दिनक्रम. मात्र, याचं प्रवासात त्याने अनेकदा आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे प्लेक्स पाहिले होते. तसेच घरी येणाऱ्या वर्तमानपत्रात सुध्दा तो साहेबांचे फोटो आणि बातम्या पाहायचा. त्यामुळे त्याला आमदार साहेबांना भेटून फोटो काढण्याची इच्छा निर्माण झाली होती. म्हणून 'मला आमदार साहेबांना भेटून फोटो काढायचाय' असा तगदा त्याने आपल्या वडीलांकडे लावला होता.
मात्र, प्रत्येक वेळी वडील त्याची समजूत काढायचे, असे हे वारंवार घडत असताना अभिजीत शिकत असलेल्या शाळेने आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाला आ.डॉ.गुट्टे यांनी हजेरी लावली होती. 'त्या' दिवसापासून अभिजीतने आ.डॉ.गुट्टे यांना भेटण्याचा हट्ट आपल्या वडीलांकडे धरला.
त्यामुळे मुलाची इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय करुन हनुमान जाधव यांनी आ.डॉ.गुट्टे यांचे विधिज्ञ ॲड.मिलिंद क्षिरसागर यांच्याशी संपर्क केला.
आणि ॲड.क्षिरसागर यांच्या पुढाकारातून शहरातील राम-सीता सदन येथे ॲड. हनुमान जाधव यांच्यासह चिमुकल्या अभिजीतने आ.डॉ.गुट्टे यांची भेट घेतली आणि येथेच्छ फोटो काढून मनसोक्त गप्पा मारल्या.
चिमुकल्या अभिजीतचे प्रांजळ बोलणे आ.डॉ.गुट्टे यांनाही मोहून टाकणारे होते. त्यामुळे 'व्हाॅटीज युवर नेम?' असं विचारत आ.डॉ.गुट्टे यांनीही 'त्या' चिमुकल्यास मांडीवर घेऊन मायेनं संवाद साधला. त्याची विचारपूस केली. त्यामुळे अभिजीत फारच आनंदून गेला होता.
यावेळी ॲड.मिलिंद क्षिरसागर, पत्रकार पिराजी कांबळे, प्रभाकर सातपुते, स्वीय सहाय्यक बाळासाहेब पवार, सामाजिक कार्यकर्ते बाबा पोले, शाम ठाकूर यांच्यासह अनेक पदधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, चिमुकला अभिजीत हा काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.हनुमान जाधव यांचा मुलगा आहे. मात्र, आ.डॉ.गुट्टे आणि ॲड.जाधव या दोघांनीही पक्षीय चौकटीच्या बाहेर जाऊन चिमुकल्या अभिजीतचा पुरविलेला बालहट्ट मनाचा मोठेपणा दाखविणारा आहे. त्यामुळे पदधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात दिवसभर सकारात्मक चर्चा रंगली होती.