परभणी(प्रतिनिधी)जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक नागरिकाला नळाद्वारे 55 लिटर पाणी देण्यासाठीची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू आहे. सदर प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन मान्यतेची आढावा बैठक संपन्न झाली.

शनिवारी (दि.1) जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर यंबडवार यांच्यासह उप अभियंता, अभियंता यांची उपस्थिती होती.

जल जीवन मिशन अंतर्गत योजनांचा सविस्तर विषयांचा आढावा घेत उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देताना जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या की, ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील नळ योजनांची उर्वरित निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात करावी.

तर उर्वरित अंदाजपत्रके तात्काळ पूर्ण करून घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी पाणी पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

जलजीवन मिशन कार्यक्रमाची सद्यस्थिती

 एकुण ग्रामपंचायत - 704

- एकुण गावे - 827

- एकुण वाड्या-1080

- रेट्रोफिटींग/नवीन योजना-689

- भुजल सर्वेक्षण पुर्ण-689

अंदाजत्रक तयार -682

- तांत्रिक मान्यता झालेली गावांची संख्या-645

- प्रशासकीय मान्यता झालेल्या गावांची संख्या-607

- निविदा प्रक्रिया झालेला गावांची संख्या-586

- कार्यारंभ आदेश निर्गमीत-414

- प्रस्तावित नळ जोडणीची संख्या–103214

- या पैकी अंगणवाडी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाण्याची व्यवस्था व घरगुती नळजोडणी अशी 4147 एवढी देण्यात आली.