अहमदनगर (प्रतिनिधी) स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नाचा स्रोत वाढावा म्हणून शासनाने अनेक व्यवसाय धान्य दुकानाच्या माध्यमातून सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असुन त्या करीता सर्व परवाना धाराकांनी आपली दुकाने आयएसओ मानांकनासाठी सज्ज ठेवावी असे अवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी केले आयएसओ मानांकन व विविध व्यवसाय प्रशिक्षण संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी म्हणाल्या की सर्व सामान्य नागरीकांचा स्वस्त धान्य दुकानदारांशी कायमचा संपर्क असतो त्यातच धान्य दुकानदारांना तुटपुंज्या प्रमाणात कमिशन मिळत असल्यामुळे दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ व्हावी तसेच नागरीकांना चांगली सेवा मिळावी या हेतूने शासनाने सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना काँमन सर्व्हिस सेंटरचा परवाना देण्याचा निर्णय घेतला असुन या माध्यमातून दुकानदारांना अनेक व्यवसाय करण्याची परवानगी मिळणार आहे मात्र त्याकरीता प्रत्येक दुकान हे आयएसओ मानांकन होणे आवश्यक आहे त्यामुळे दुकानदारांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दुकानाची स्वच्छता रंगरंगोटी करुन घ्यावी दुकानदारांना ठरवुन दिलेले फलक तातडीने दुकानात लावावेत दुकानात सीसीटीव्ही कँमेरे लावणे बंधनकारक आहे या सर्व बाबींची तातडीने पुर्तता करुन दुकाने आयएसओ मानांकनासाठी तयार ठेवावी असे अवाहनही माळी यांनी केले या वेळी स्टेशनरी पासून ते खात्यात पैसे भरणे पैसे काढणे रेशनकार्डात नाव दाखल करणे नाव कमी करणे दुबार रेशनकार्ड काढणे दोन चाकी चार चाकी गाडी बुक करणे आरोग्यविषयक माहीती घेणे विमा उतरविणे गँस सिलेंडर मिळविणे विविध प्रकारचे दाखले मिळविणे या बाबत प्रात्याक्षीकासह विविध कंपन्यांच्या वतीने माहीती सादर करण्यात आली या वेळी मच्छिंद्र चितळे अशीष विर महेश वाघमारे विवेक कुलकर्णी विनोद अहीरे आदिंनी विविध योजनांची माहीती दिली या वेळी पुरवठा निरीक्षण अधिकारी राजेंद्र राऊत दत्तात्रय भावले कार्यालयीन प्रतिनिधी मनिष सचदेव अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई सचिव रज्जाक पठाण तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले अनिल मानधना नगर तालुकाध्यक्ष विश्वासराव जाधव नगर शहरचे अध्यक्ष बाळासाहेब दिघे दिलीप गायके अजीज शेख बबलु गवारे एकनाथ थोरात आदिसह तालुका पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांनी केले तर पुरवठा निरीक्षण अधिकारी अभिजीत वांडेकर यांनी आभार मानले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
DOUBLE CHIN FAT & FACE LIFT | BEST FACIAL EXERCISES
DOUBLE CHIN FAT & FACE LIFT | BEST FACIAL EXERCISES
अखिलेश यादव ने फिर केशव मौर्य पर कसा तंज : कहा- वह दिल्ली के मोहरे बन गए हैं
समाजवादी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव ने कहा कि केशव प्रसाद मौर्य दिल्ली के मोहरा बन...
જૂનાગઢ ગિરનાર પર્વત પર 16 કળાએ પ્રકૃતિ ખીલી ઉઠી
જૂનાગઢના ગિરનાર પર વરસેલા ભારે વરસાદથી હાલ ચોતરફ લીલોતરી
છવાઈ છે, આ કુદરતી નજારો માણવા જેવો...
Fruits for Healthy Skin: स्किन टेक्सचर को इंप्रूव कर उसे हेल्दी व जवां बनाए रखने में मददगार हैं ये फल
अगर आपकी स्किन पर चमक नहीं है। कील-मुंहासों के साथ दाग-धब्बों से अलग परेशान कर रखा है और बढ़ती...
ঢকুৱাখনাৰ মৰনৈ বেবেজীয়াৰ কৈবৰ্ত গাঁৱত অনুষ্ঠিত হ'ল সমূহীয়া বিবাহ।
ঢকুৱাখনাৰ মৰনৈ বেবেজীয়াৰ কৈবৰ্ত গাঁৱত আয়োজন সমূহীয়া বিবাহ।
এযোৰ দুযোৰ নহয় হিন্দু ধৰ্মৰ নীতি নিয়মেৰে বৃহস্পতিবাৰে নিশা বিবাহ পাশত আৱদ্ধ হ'ল ২৭ যোৰাকৈ দৰা কইনা।
আৰ্থিক ব্
ঢকুৱাখনাৰ মৰনৈ বেবেজীয়াৰ কৈবৰ্ত গাঁৱত অনুষ্ঠিত হ'ল সমূহীয়া বিবাহ।
ঢকুৱাখনাৰ মৰনৈ...