जनता न्यूज चॅनल प्रतिनिधी माबुद खान

जिंतूर: शहरातील जागृत हनुमान मंदिर चौकामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री दुर्गेश्वरी युवक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात यंदा भाविकांमधून मोठा उत्साह पहावयास मिळत आहे. 

          मागील अडीच वर्षाच्या काळात कोरोनामुळे निर्बंध असल्याने फारसे कार्यक्रम झाले नाही. मात्र अडीच वर्षांनंतर यंदा प्रथमच नवरात्रीच्या उत्सवात देवींच्या मंदिरात ठिकठिकाणी गर्दी होत आहे.

         जिंतूर शहरातील जागृत हनुमान मंदिर चौकात १९९३ सालापासून श्री दुर्गेश्वरी युवक मंडळाच्या वतीने देवीची स्थापना मोठ्या उत्साहात होते. या मंडळाच्या वतीने रोज सायंकाळची आरती ही परीसरातील २० ते २१ यजमानांच्या हस्ते होत असते.

आरतीला ४५० ते ५०० भाविक उपस्थित राहत असून सर्वांना दररोज वेगवेगळा प्रसाद वाटप करण्यात येतो. यानंतर दररोज दांडिया, गरबा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत.

         सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी अध्यक्ष प्रदीप चव्हाण उपाध्यक्ष, गणेश कूरे, सचिव- बालाजी पोरवाल, कोषाध्यक्ष -संजय वट्टमवार, बंडू शेठ भुतडा, संतोष वट्टमवार, गोपाळ चिद्रवार, गजानन वट्टमवार, सुनील वट्टमवार, कपिल चवंडके, आकाश शहाणे, सुमित शहाणे, अजय शहाणे, प्रशांत शहाणे, मंडगे, शिंदे, अग्रवाल, तसेच पुजारी - बाळू गुरू चारठाणकर, कळवे गुरु, गोंधळी कल्याण सोनवणे आदी परिश्रम घेत आहेत.