माळशिरस तालुक्यातील मोटेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन रविवार दि. ९/१०/२०२२ ते शनिवार दि. १५/१०/२०२२ अखेर संतोबा बिरोबा ज्योतिबा मंदिर दडसवस्ती येथे करण्यात आले आहे. सदर व्यासपीठाचे चालक ह.भ.प. बापू महाराज देशमुख फोंडशिरस, मोटेवाडी आहेत तर मार्गदर्शक ह.भ.प. मधुकर धनवे महाराज वडवळ हे मार्गदर्शक आहेत.
या सप्ताहामध्ये रविवार दि. ९/२०/२०३३ रोजी प्रवचनकार ह. भ. प. अभय महाराज वीर यांचे कीर्तन होणार असून या दिवशी नाष्टा माणिक महादेव दडस, दुपारी कोंडीबा शिवराम वाघमोडे आणि संध्याकाळी पोपट सर्जेराव भाळे यांच्यावतीने अन्नदान करण्यात येणार आहे. सोमवार दि. १०/१०/२०२२ रोजी प्रवचनकार ह.भ.प. मयूर महाराज पवार युवा कीर्तनकार अंबाजोगाई यांचे कीर्तन गोरक्ष नगर चौगुले वस्ती येथे होणार असून या दिवशी नाष्टा रणजीत वलेकर वटपळी, दुपारी मामा महादेव हुलके आणि संध्याकाळी पांडुरंग नारायण हुलगे यांच्यावतीने अन्नदान करण्यात येणार आहे.